Mega job fair2025: मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा 2025
Mega job fair2025: सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवसाय प्रशिक्षण आणि सेवा योजन कक्ष, जिल्हाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर (महाराष्ट्र शासन), नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ऑगस्ट 2025 रोजी कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे या मेळाव्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य मुद्दे : –
1600 हून अधिक रोजगाराच्या संधी
Mega job fair2025 : मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात 25 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी विविध शैक्षणिक विद्या शाखांतील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या रोजगार मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थॉमस कुक, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, पँटलून्स, लुपिन लिमिटेड, सुथरलँड यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन, औषध निर्माण व सेवा क्षेत्रातील विविध संधींचा यात समावेश आहे.
मुलाखती घेऊन त्वरित निवड
हा राज्यस्तरीय उपक्रम सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मेळाव्याद्वारे नोकरी इच्छुक उमेदवार व विविध क्षेत्रातील नियोक्ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्योगांना योग्य कौशल्याधारित मनुष्यबळ आणि उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या थेट संधीसाठी या रोजगार मेळाव्याचे महत्व अधोरेखित होणार आहे. कौशल्य विकास केंद्रांमार्फत राज्यभर असे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित केले जात असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्वरित निवड केली जाते.
इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन
विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या व्यापक हेतूने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मुंबई विद्यापीठात करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (सीटीपीसी ) स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण प्लेसमेंट्स, इंटर्नशिप, उद्योजकता संधी, रोजगार मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते तसेच नियमितपणे रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हस आयोजित केले जातात.


कशी कराल नोंदणी?
या मेगा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ युवक सक्षमीकरण व राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आपला सहभाग नोंदवित आहे. इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8 या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजनकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा 22 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मुंबई विद्यापीठ, जिल्हाकौशल्य विकास केंद्र, नवभारत मेगा डेव्हलपर्स आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जात आहे.
या रोजगार मेळाव्यात कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
या मेळाव्यात 25 हून अधिक नामांकित कंपन्या, जसे की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, लुपिन लिमिटेड आणि थॉमस कुक, सहभागी होत असून 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन आणि औषध निर्माण क्षेत्रातील विविध पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संधींचा समावेश आहे. तसेच, मुलाखतीद्वारे त्वरित निवड होईल.
या मेळाव्यासाठी नोंदणी कशी करावी?
इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8
या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आयोजनकांनी सुचविले आहे. मुंबई विद्यापीठाचे करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि इनक्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने उद्योजकता आणि रोजगार मार्गदर्शनाच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.